कर वसुलीतील हलगर्जीपणा पडणार महागात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागांतर्गत मालमत्ता कर वसुली करण्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालात त्याची उत्कृष्ट अशी नोंद केली जाणार आहे. त्याचबरोबर अपेक्षित उद्दीष्ट्य गाठू न शकणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरा नोंदविला जाणार आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढलेल्या अध्यादेशाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्‍तांनी याबाबतचे परिपत्रक काढले आहे.

लोकलेखा समितीच्या 2017-18 च्या 13 व्या विधानसभेच्या 28 व्या अहवालान्वये स्थानिक स्वराज्य संस्थांनी वसूल करण्यात येणाऱ्या मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर करांच्या विशेष वसुलीसंदर्भात संबंधितांच्या गोपनीय अहवालात नोंद करण्याबाबत शिफारस केली आहे. त्या अनुषंगाने महापालिकेच्या करांची वसुली आणि थकबाकी यांची नोंद गोपनीय अहवालात घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर करांच्या विशेष वसुलीसंदर्भात उल्लेखनीय कामगिरीची तसेच कार्यकालावधीतील वसुलीचे प्रमाण याची नोंद संबंधित कर्मचारी, अधिकारी यांनी स्वयंमूल्यांकन अहवालात करावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर करांच्या विशेष वसुलीसंदर्भात संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गोपनीय अहवालात नोंद करण्यात येणार आहे. कर वसुलीची नोंद न केल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अहवालात प्रतिकूल कामगिरीबाबत शेरा नमूद करण्यात येणार आहे.

प्रतिवेदन अधिकाऱ्यांनी संबंधित करांच्या वसुलीचे प्रमाण 90 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक असल्यास उत्कृष्ट कर वसुलीची नोंद संबंधितांच्या कार्यमुल्यांकन तथा गोपनीय अहवालात करावी. करांच्या वसुलीचे प्रमाण 70 टक्‍क्‍यांपेक्षा कमी असल्यास कार्यमुल्यांकन तथा गोपनीय अहवालात स्पष्ट नोंद करून कामाच्या एकत्रित मुल्यांकनासाठी त्याचा विचार करावा. पुनर्विलोकन अधिकाऱ्यांनी याप्रमाणे कार्यवाही झाली असल्याची खातरजमा करून कार्यमुल्यांकन करावे. मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर करांच्या वसुलीसंदर्भात संबंधितांनी नोंद न केल्यास त्याची विशेष नोंद घेऊन प्रतिकूल कामगिरीबाबत शेरा नमूद करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

परिपत्रकामुळे कर्मचाऱ्यांची जबाबदारी वाढली
मालमत्ता कर, पाणीपट्टी आणि इतर करांची विशेष वसुली 100 टक्के व्हावी, याकरिता कर संकलन विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी विशेष मोहिम राबविली जाते. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील कर संकलन कार्यालये उघडी ठेवली जातात. मात्र, तरी देखील या परिपत्रकामुळे काम चुकार कर्मचाऱ्यांना आपल्या कार्याची चुणूक दाखविणे भाग पडणार आहे. अन्यथा गोपनीय अहवालात प्रतिकूल शेरा अटळ असणार आहे. याचा परिणाम भविष्यातील वेतनवाढ व पदोन्नतीवर होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)