कर आकारणीविरोधात न्यायालयात दाद मागणार 

महाबळेश्‍वरमध्ये मिळकतदारांच्या बैठकीत निर्णय : मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीचीची मागणी करण्याचा निर्णय

महाबळेश्‍वर – येथील हॉटेल व लॉजची प्रतवारी करून प्रत्येक वर्गासाठी वेगवेगळे मिळकतकर आकारणीच्या निर्णयाचा पालिकेने पुर्नविचार करावा. मिळकत धारकांच्या मागणीचा विचार केला नाही तर या न्यायालयात दाद मागण्याचा व कायम नॉट रिचेबल मुख्याधिकारी यांच्या बदलीची मागणी राज्य शासनाकडे करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

-Ads-

कर आकारणीबाबत मिळकतदारांची आज बैठकी झाली. याप्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर हे उपस्थित होते. पालिकेच्या चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे दर निश्‍चित करण्यासाठी पालिकेने 2012 पासून नगररचना विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यास सुरूवात केली होती.

तत्कालिन मुख्याधिकारी मुयरा शिंदेकर, सचिन पवार, आशा राऊत यांनी जुन्या वापरातील वाणिज्य इमारतींना 40 टक्‍के करवाढ सुचवून नविन वाणिज्य वापराच्या इमारतींना प्रतवारीनुसार कर आकारणीची शिफारस केली होती. त्यांनी पाठवलेल्या प्रस्तावावर तसा स्पष्ट उल्लेख आहे. परंतु, विद्यमान मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी प्रस्तावात हातचलाखी करून सरसकट हॉटेल व लॉजच्या मिळकतींना प्रतवारी लागू केली. यामुळे मिळकत करात भरमसाठ वाढ झाली. या प्रतवारीमुळे कोणाला चौपट तर काहींना पाचपट कर आकारला गेला आहे.

यामुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे. मात्र, सत्ताधारी भाजपा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्याकडे दुर्लक्ष करून करवाढ व प्रतवारी मागे घेण्यास नकार दिला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे म्हणाले, नगरसेवकांच्या मिळकतींचा समावेश रहीवासमध्ये करण्यात आला आहे तर विरोधकांच्या अनेक इमारतींचा वापर रहीवास असूनही वाणिज्य वापर दाखवून जबर कारवाढ केली आहे. सुभाष चौकातील वाणिज्य वापराची एका इमारत पूर्ण होवून दोन वर्षे झाली तरी त्या इमारतीला कर आकारणी करण्यात आली नाही.

डी. एम. बावळेकर म्हणाले, ज्यांनी निवडून दिले, त्यांच्या हिताचे रक्षण जर त्यांना करता येत नसेल तर लोकप्रतिनिधीना सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही. यावेळी नगरसेवक रविंद्र कुंभारदरे, शारदा ढाणक, विमल ओंबळे, विशाल तोष्णीवाल, तालुका प्रमुख यशवंत घाडगे, शहर प्रमुख विजय नायडू, हॉटेल संघटनेचे अध्यक्ष योगेश बावळेकर, सुनिल कोमटी, राजेंद्र बोधले, अनंत भिसे, सुरेश सपकाळ, ऍड. प्रभाकर हिरवे आदी मान्यवर उपस्थित होते.

अन्‌ नगराध्यक्षांचा इगो हर्ट झाला… 
करवाढीवरून नागरिकांनी पालिकेवर मोठा मोर्चाही काढला होता. परंतु, मोर्चेकऱ्यांनी फक्त मुख्याधिकारी यांची भेट घेतल्याने नगराध्यक्षांचा ईगो हर्ट झाला. त्यामुळे मिळकत करवाढीचा प्रश्‍न अधिकच चिघळला. दोन वेळा अपिल करूनही कर कमी न झाल्याने अखेर मिळकतधारकांनी आज राम मंदीरात एक बैठक घेतली होती. बैठकीत न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)