कर्वे रोडवरील चोख व्यवहाराची पेढी चित्तरंजन गोरखनाथ अष्टेकर

पुणे – सुवर्ण व्यवसायात चोख व्यवहार जपण्याची “चित्तरंजन गोरखनाथ अष्टेकर ज्वेलर्सची’ परंपरा आहे. आजही आम्ही ही परंपरा जिवापाड जपली आहे. म्हणूनच आज कितीही स्पर्धा असली तरी “सीजी’चा ग्राहकवर्ग टिकून आहे. नवीन ग्राहक वर्ग वाढत आहे. “ग्राहक देवो भव’ या पेढीचे ब्रीद आहे, अशी भावना चित्तरंजन गोरखनाथ अष्टेकर ज्वेलर्सचे संचालक सुशील व आलोक अष्टेकर यांनी व्यक्‍त केली.

अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर दि. 18 ते 22 एप्रिल या कालावधीत सोन्याच्या सर्व दागिन्यांच्या मजुरीवर सरसकट 20% सूट दिली जाणार आहे तरी ग्राहकांनी या योजनेचा जरूर लाभ घ्यावा, असे आवाहन सी. जी. अष्टेकर ज्वेलर्स यांच्यातर्फे करण्यात आले आहे. 1997 मध्ये कर्वेरोडवर चित्तरंजन अष्टेकर यांनी हे दालन सुरू केले. बदलत्या काळानुसार दागिन्यांची डिझाईन्स, बाजारातले नवे ट्रेंडस्‌ आत्मसात केले.

-Ads-

त्यामुळे आज या पेढीमध्ये सर्व वयोगटातील ग्राहकांना आवडणारे सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध आहेत. येथील डिझाईन्सही अत्यंत आकर्षक असल्याने तरुण पिढीतील मुलींनाही आवडतात. त्याचप्रमाणे “डायमंड ज्वेलरीकडे कल वाढत असल्याने त्यांनी स्वत: घडवून घेतलेली असंख्य डिझाईन्स इथे उपलब्ध आहेत. चांदीच्या वस्तू, दागिने, नवग्रह रत्ने, खडे हेही इथे उपलब्ध आहेत. विनम्र आणि तत्पर सेवा आणि चोखंदळ ग्राहकांची आवड ओळखून त्यानुसार त्यांना दागिने, वस्तू देणे, काय घ्यावे? याबाबत अनुभवी मार्गदर्शन करण्यात अष्टेकर पितापुत्र दक्ष असतात.त्यामुळे चोख व्यवहार जपणारी ही पेढी ग्राहकांची आवडती पेढी आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)