कर्वे रस्ता वाहतूक बदलावर तोडगा नाही

मेट्रोने बदलाचा अभ्यास करून निष्कर्ष काढण्याच्या सूचना

पुणे – नळस्टॉप परिसरात उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वीच्या वाहतूक बदल चाचणीवर अद्याप तोडगा निघू शकला नाही. याबाबत शनिवारी झालेल्या बैठकीत मेट्रोकडून काही बदल सूचविण्यात आले. मात्र, मेट्रोने संबंधीत बदलाचा अभ्यास करून निष्कर्ष काढावा. यानंतरच बदलाचा ट्रायलसाठी विचार होईल, असे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कर्वे रस्त्यावर नळस्टॉप येथे प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यासाठी एसएनडीटी ते नळ स्टॉप या दरम्यान वाहतुकीत बदल करावा लागणार आहे. त्यासाठी मेट्रो प्रशासनाने वाहतूक पोलिसांना वाहतूक बदलाचे दोन पर्याय दिले होते. त्यापैकी पहिल्या पर्यायाची काही दिवसांपूर्वी चाचणी घेण्यात आली. मात्र, ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने ही चाचणी फसल्याने त्याला स्थगिती दिली. तर चक्राकार वाहतुकीमुळे देखील आवश्‍यक तो फायदा होणार नसल्याने वाहतूक पोलिसांकडून मेट्रोला नव्याने अभ्यास करण्याचे सांगण्यात आले होते.

यानुसार शनिवारी मेट्रो, वाहतूक पोलीस, स्थानिक प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. बैठकीत रस्त्यावरील सिग्नल अलीकडे घेणे, तसेच पूर्वीप्रमाणे काही वाहतूक सरळ तर याचवेळी काही वाहतूक चक्राकार करावी, अशी चर्चा झाली. याला काहींनी विरोधही केला. मात्र, नव्याने सूचविण्यात आलेल्या बदलाचा मेट्रोने स्वतः अभ्यास करून निष्कर्ष काढावा. यानंतर वाहतूक बदलाचा विचार करण्यात येईल, असे सांगत अद्याप यावर काही ठोस निर्णय झाला नसल्याचे वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

रस्त्यावरील सिग्नल सरकवणे, तसेच सरळ आणि चक्राकार वाहतुकीबाबत चर्चा झाली. मात्र, ठोस निर्णय झालेला नसून मेट्रोने सूचविलेल्या बदलांवर अभ्यास करून निष्कर्ष काढण्याचे सांगण्यात आले आहे. यानंतर वाहतूक बदलाचा विचार करण्यात येईल.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)