कर्मवीर स्कॉलरशिप परीक्षा उपक्रम सुरु

व्हेक्‍टर ऍकॅडमी, दै प्रभात आणि इंगळे ग्रुपचा संयुक्त पुढाकार
सातारा, दि.4 (प्रतिनिधी)- व्हेक्‍टर ऍकॅडमी, दै प्रभात आणि इंगळे ग्रुप यांचा संयुक्त विद्यमाने इ. 10 वीसाठी कर्मवीर स्कॉलरशिप परीक्षा उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
व्हेक्‍टर ऍकॅडमी नेहमीच शैक्षणिक आणि सामाजिक कामे करत असते या वर्षीपासून कर्मवीर स्कॉलरशिप परीक्षा सुरु करत आहेत. याच अनुषंगाने इ. 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप परीक्षा उपक्रम दि. 4 जानेवारीपासून सुरु झाला आहे. यामध्ये सहभागी होण्याचा पहिला मान अजिंक्‍यतारा माध्यमिक विद्यालय शाहूनगर, शेंद्रे कारखाना, सातारा यांनी मिळवला. हा उपक्रमाची सुरुवात जोरात होण्यासाठी शाळेचे मुख्याद्यापक एस. एस. नलावडे यांनी सहकार्य केले. या उपक्रमासाठी उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून सातारा जिल्ह्यातील अनेक शाळांनी सहभाग नोंदवला आहे आणि अजूनही या उपक्रमात शाळा आपली नावनोंदणी करू शकतात.
या परीक्षेमध्ये पहिल्या येणाऱ्या 5 विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी स्कॉलरशिप दिली जाईल (11 वी व 12 वी सायन्सची संपूर्ण फी दिली जाईल तसेच ही परीक्षा जेईई/नीट/एनडीए/एमपीएससी या सारख्या परीक्षांच्या धर्तीवर हा पेपर बहुपर्यायी ठेवला जाणार आहे. ही परीक्षा विनामूल्य घेतली जाणार आहे. जे विद्यार्थी या परीक्षेसाठी बसणार आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी जेईई/नीट/एनडीए संदर्भात मोफत शिबीर आयोजिले जाणार आहे. या शिबिरादरम्यान मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
ज्या शाळांच्या मुख्याधापकांना आपली शाळा या कर्मवीर स्कॉलरशिप परीक्षेमध्ये सहभागी व्हावी असे वाटत असेल त्यांनी या 8744034456 / 7447442501 क्रमांकावर संपर्क करावा आणि आपल्या शाळेची नोंदणी करावी. सातारा मधील सर्व 10 वीच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आयोजकांमार्फत आवाहन करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)