कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक

मंचर- महात्मा गांधी विद्यालय मंचर, भागशाळा वडगाव काशिंबेग (ता. आंबेगाव) येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांची प्रतिमा व चित्ररथाची मिरवणूक काढण्यात आली. रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीची सुरवात शाळा समितीचे सदस्य बाळासाहेब पिंगळे, माजी सरपंच बाळासाहेब शिंदे, प्रशांत वाळुंज, गणेश खिरड, अनिल मानकर व विकास पिंगळे यांच्या उपस्थितीत झाली. गावामध्ये नागरिकांनी उत्स्फुर्तपणे चित्ररथाचे स्वागत केले. मिरवणुकीमध्ये अग्रभागी ढोल-ताशा, वाद्यपथक होते. तसेच फेटे बांधलेल्या विद्यार्थीनी लेझीम, झांज व टिपरी पथकात सहभागी झाले होते. गावामध्ये मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी विविध पथकातील खेळांची प्रात्यक्षिके सादर केली. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने विद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी सांगितले. यामध्ये व्याख्यानमाला, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावरील माहितीपट, विज्ञान प्रदर्शन, माजी विद्यार्थी मेळावा, रांगोळी प्रदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)