कर्मयोगी कारखाना सर्वच बाबींमध्ये अग्रेसर

हर्षवर्धन पाटील : कर्मयोगीची पहिली उचल 2100 रुपये खात्यावर जमा

बिजवडी- इंदापूर तालुक्‍यातील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामामध्ये गाळपास आलेल्या उसासाठी पहिल्या पंधरवड्याच्या ऊस बिलाचा पहिला हप्ता 2100 टनाप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर शुक्रवार (दि. 14) रोजी जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी दिली. कारखान्याच्या गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू असून गाळपाचे उद्दिष्ट नक्‍कीच साध्य होणार आहे. अंतिम ऊस दराच्या बाबतीतही आपण इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कारखान्याच्या यंदा गळीत हंगामामध्ये आजअखेर 4 लाख 10 हजार मेट्रिक टन गाळप केलेले आहे. 4 लाख 35 हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन झालेले आहे. सरासरी साखर उतारा 10.65 टक्‍के आहे. कारखान्याची ऊस तोडणी प्रक्रिया नियोजनाप्रमाणे सुरू आहे. परंतु यावर्षी अत्यल्प पाऊस झाला आहे. उजनीची पाणीपातळी नोव्हेंबरमध्येच खालावली आहे. कॅनॉलच्या पाण्याची आवर्तने मिळालेली नाहीत. त्यामुळे पाण्याअभावी वाळणारा व हुमणीग्रस्त ऊस प्राधान्याने तोडून आणण्याची कार्यवाही कारखाना करीत आहे. त्यामुळे उसाच्या टनेजमध्ये होणारी घट थांबवून सभासदांचे नुकसान टाळण्यासाठी अग्रक्रम दिला आहे. कारखान्याने हंगामामध्ये बारा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. यावेळी कारखान्याचे संचालक भरत शहा, भास्कर गुरगुडे, विष्णू मोरे, हनुमंत जाधव, मच्छिंद्र अभंग, अंकुश काळे, सुभाष काळे, प्रशांत सूर्यवंशी, रमेशराव जाधव, यशवंत वाघ, मानसिंग जगताप, राजेंद्र गायकवाड, राहुल जाधव, अंबादास शिंगाडे, वसंत मोहोळकर, केशव दुर्गे, जयश्री नलवडे, अतुल व्यवहारे, राजेंद्र चोरमले, गोपीचंद गलांडे, पांडुरंग मारुती गलांडे, सुभाष भोसले व कार्यकारी संचालक बाजीराव सुतार आदी उपस्थित होते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)