कर्मचाऱ्याने चोरला कंपनीचा डेटा

पुणे- कर्मचाऱ्याने कंपनीचा डेटा चोरून कंपनीची बदनामी केल्याची घटना कल्याणीनगर येथे घडली. याप्रकरणी कंपनीच्या कर्मचाऱ्याविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साहील सुरवसे (33, रा. विश्रांतवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कामेश विरेश गौड (रा. नोयडा) याच्याविरुध्द माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांची कल्याणीनगर येथे विदुषी इन्फोटेक एस.एस.पी.प्रा.लि. नावाची कंपनी आहे. येथे गौड हा कामाला असताना त्याने एप्रिल ते नोव्हेंबर 2017 या कालावधीत कंपनीचा सर्व गोपनीय डेटा आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या कामासंबंधी डेटा हार्ड डिस्क व पेन ड्राईव्हवर कॉपी करून घेतला. तसेच ग्राहकांची गोपनीय माहिती असलेला स्काईप आयडी आणी पासवर्ड स्वत:च्या फायद्याकरीता वापरला.

कंपनीला नुकसान पोहोचविण्याच्या उद्देशाने त्याने स्वत:च्या व्यक्तीगत ई-मेल आयडीवर पाठविले आहे. तसेच, कंपनीच्या संकेत स्थळावर बनावट ई-मेल आयडी तयार करून त्याव्दारे बदनामिकारक मजकूर टाकला. या बदनामीमुळे फिर्यादीची प्रतिमा मलीन होण्याबरोबरच कंपनीच्या महत्त्वाच्या ग्राहकांनी कंपनीशी असलेले व्यावसायीक करार रद्द केले. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद महाजन तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)