कर्मचाऱ्यानेच घातला गृहसंस्थेला गंडा

पिंपरी – गृहसंस्थेतील इमारतींच्या देखभालीसह इतर कामांसाठी नेमलेल्या कामगाराने गृहसंस्थेच्या सभासदांकडून वेळोवेळी 46 हजार रूपये घेऊन त्याचा हिशोब न देता गंडा घातला. हा प्रकार पिंपळे-निलख येथीप रक्षक सोसायटीत घडला.

मेजर सुरेश जानीमल भाटीया (वय-71, रा. रक्षक सोसायटी, पिंपळे-निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दयानंद विनायक कोलवलकर (रा. भोई आळी, संगम बेकरीजवळ, पौड) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे.

भाटीया हे गृहसंस्थेचे व्यवस्थापक आहेत. गृहसंस्थेने 19 सप्टेंबर 2016 पासून मॅन टू हेल्प फ्रिडम पार्क या कंपनीबरोबर गृहसंस्थेतील इमारतींच्या देखभालीसह इतर कामांसाठी करारनामा केला होता. कंपनीने या कामासाठी कोलवलकर याची नेमणूक केली होती.

कोलवलकर याने इमारतींच्या देखभालीसह इतर कामांसाठी गृहसंस्थेच्या सभासदांकडून वेळोवेळी 46 हजार रूपये रोख रक्कम घेतली. मात्र, त्याचा हिशोब न देता रक्कमही गृहसंस्थेच्या बॅंक खात्यात जमा केली नाही. त्यामुळे पैशाचा अपहार केल्याप्रकरणी कोलवलकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)