कर्मचाऱ्याकडून 9 लाखांचा गंडा

पिंपरी – पिंपळे गुरव येथे कंपनीचा धनादेश स्वतःच्या खात्यात जमा करुन कर्मचाऱ्याने कंपनीची 9 लाखांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी चिराग पुरुषोत्तम राठोड (वय-45 रा. पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली असून गिरीधर गोविंद परमार (वय-60, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परमार हा ए. पी. कॉपरेशन कंपनीत कामाला आहे. येथे त्याने कंपनीच्या नावे असलेला 9 लाखांचा धनादेश स्वतःच्या खात्यात जमा केला. रक्‍कम जमा न झाल्याने चौकशी केली असता हा सारा प्रकार उघडकीस आला. त्यानुसार आर्थिक फसवणुकीचा गुन्हा परमार वर दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)