कर्मचाऱ्यांनी पीएचडी केल्यास मिळणार 50 हजार रूपये

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने प्रोत्साहनपर निधी म्हणून 50 हजार रूपये देण्याचे मंजूर केले आहे. त्यामुळे आता शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पीएचडी करण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. याबाबतचा निर्णय 1 जानेवारी 2018 नंतर पीएचडी झालेल्यांना लागू असणार असल्याचे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाने शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर निधी देण्यास 2005-06 सालापासून सुरूवात केली आहे. सुरूवातीला 25 हजार रुपये निधी देण्यात येत होता. 4 जून 2018 रोजी व्यवस्थापन परिषदेने घेतलेल्या निर्णयानुसार त्यात 10 हजारांनी वाढ करत हा निधी 35 हजार करण्यात आला. त्यानंतर 27 ऑगस्टच्या व्यवस्थापन परिषदेदरम्यान हा निधी 35 वरून 50 हजार करण्यात आला असल्याचे कुलसचिवांकडून सांगण्यात आले आहे. मात्र, यासाठी काही नियम व अटी लागू असणार असल्याचेही विद्यापीठाच्या परिपत्रकात नमूद केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)