कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आठ वर्षांत 13 परिपत्रके

A man with gray balding hair and mustache, wearing a black suit, red necktie and white shirt, sitting on a dark teal chair behind a brown desk with his gray laptop and name plaque on top of the table, parts his mouth to scream in anger at his employee with black hair, blue pantsuit, black shoes, red tie and white shirt, while extending a white paper in his left hand

पिंपरी – महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासन कसोशिने प्रयत्न करत आहे. मात्र, हे कर्मचारी मात्र प्रशासनाला दाद देत नाहीत. या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी गेल्या आठ वर्षांत आतापर्यंत 13 परिपत्रके काढण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतेच तेरावे परिपत्रक काढत, कारवाईचा इशारा दिला आहे.

प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहणे बंधनकारक आहे. कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन उपस्थितीसाठी बायोमेट्रीक थम्ब प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. पंरतु, महापालिकेतील अनेक अधिकारी, कर्मचारी कार्यालयीन शिस्तीचे व बायोमेट्रीक थम्ब प्रणालीचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी परिपत्रकाद्वारे नियमावली जारी केली आहे.

अधिकारी, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी लावण्याबरोबच हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणेही बंधनकारक आहे. मात्र, काही अधिकारी, कर्मचारी बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे हजेरी न लावता केवळ हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करतात. थम्ब करत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते. ही बाब अयोग्य आहे. एका महिन्यात तीन वेळा कार्यालयात उशिरा आल्यास संबंधितांची किरकोळ रजा खर्ची टाकावी. किरकोळ रजा शिल्लक नसल्यास अर्जीत रजा खर्ची टाकावी. ही कार्यवाही दरमहा करण्यात यावी. याबाबत जारी केलेल्या आदेशाची नोंद सेवानोंद पुस्तकात घ्यावी व रजा वजावट करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पुढील महिन्याच्या 15 तारखेपूर्वी प्रशासन विभागाकडे पाठविण्यात यावा. तसेच ज्या महिन्यात एकही अधिकारी, कर्मचारी उशिरा आले नसल्यास तसा अहवालही
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करताना दर्शनी भागावर ओळखपत्र लावावे. पदानुसार निश्‍चित केलेला गणवेश परिधान करावा. कार्यालयीन वेळेत कामाची जागा सोडून इतरत्र फिरु नये. भोजनाची सुट्टी संपल्यानंतर दुपारी दोन वाजता वेळेत कार्यालयात हजर रहावे. अन्यथा अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांविरूद्ध शाखा प्रमुखांनी शिस्त भंगाची कारवाई करावी, असे आयुक्तांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

दुजाभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई
काही आहरण वितरण अधिकारी स्वत:च्या बाबत बायोमेट्रीक थम्ब प्रणालीद्वारे तीन वेळा उशिरा आल्यास कारवाई करत नाहीत. तसेच कारवाई न करण्याबाबत कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर दबाव आणतात. असा दुजाभाव करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. याबाबतचे अहवाल सादर केले नसल्यास एक वेळ संधी म्हणून ते त्वरीत सादर करावेत. बायोमेट्रीक थम्ब प्रणालीच्या सवलतीचे प्रशासन विभागाने जारी केलेले आदेश ग्राह्य धरण्यात येतील. विभागांनी परस्पर घेतलेली मान्यता किंवा तोंडी आदेश ग्राह्य धरले जाणार नाहीत. अधिकारी, कर्मचाऱ्यांची बदली झाल्यास त्या विभागातील थम्ब मशिनवर थम्ब रजिस्ट्रेशन शाखा प्रमुखांच्या लेखी परवानगीने करण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)