कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्यास ग्रामसेवकांवर कारवाई होणार

नगर: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन रखडल्यास, संबंधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन महिन्यांच्या 4 तारखेपर्यंत करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने दिले असून, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी त्यास दुजोरा दिला आहे.

ग्रामपंचायतींमध्ये कर्मचारी पूर्णवेळ काम करतात, मात्र त्यांना शासकीय दर्जा नाही. लोकसंख्येनुसार काही हिस्सा राज्य शासन आणि काही हिस्सा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जमा करून या कर्मचाजयांना वेतन दिले जाते. ग्रामपंचायत कर्मचाजयांना वेळेत वेतन मिळत नव्हते. अनेकदा 5 ते 6 महिने वेतनच दिले जात नसल्याच्या तक्रारी वारवार जिल्हा परिषदांकडे येत होत्या. शासन आदेशानुसार महिन्याच्या 1 ते 4 तारखांदरम्यान शासन जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्मचाजयांच्या खात्यावर वेतन जमा करेल. त्याच कालावधीत ग्रामपंचायतींनीही आपला हिस्सा जमा करणे अपेक्षित आहे. तसे झाले नाही तर संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई होऊ शकते.

जिल्ह्यामध्ये 2 हजार 729 ग्रामपंचायत कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांची ऑनलाईन माहिती संकलित करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने दिली. दरम्यान, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या राज्य हिश्‍श्‍याची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यांत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली असून कर्मचाऱ्यांचे नावे ऑनलाईन प्रणालीमध्ये भरून ती जिल्हा परिषदेकडे सादर करण्यात आले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)