कर्मचाऱ्यांची संमती असेल, तरच वर्गणी कपात

आयुक्तांचे आदेश


कामगारांना दिलासा

पुणे- महापालिकेतील मान्यताप्राप्त कामगार संघटनांची वार्षिक वर्गणी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कपात करायची असल्यास कर्मचाऱ्याच्या संमतीशिवाय ती कपात करू नये, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

दरम्यान, कामगारांच्या मार्च 2018 च्या वेतनातून पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यता प्राप्त) आणि पीएमपी एम्प्लॉईज युनियन या संघटनांच्या सदस्यांच्या प्रत्येकी 300 रुपये वर्गणीची कपात करण्यास आयुक्तांनी मान्यता दिलेली आहे. ही मान्यता देताना, कर्मचाऱ्याच्या संमतीची अट घालण्यात आली आहे. मागील काही वर्षात कर्मचारी संघटनांच्या मागणीनुसार, प्रशासनाकडून थेट वर्गणी कपात केली जात होती. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दोन्ही संघटनांची वर्गणी दिली जात होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून याबाबत नारजी व्यक्‍त करण्यात येत होती. त्यामुळे या वर्षी कर्मचाऱ्याचे संमती पत्र असेल तरच संघटनेची वर्गणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

महापालिकेतील 17 हजार कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. तसेच काही कर्मचारी दोन्ही संघटनांचे सदस्य आहेत. या कर्मचाऱ्यांनी संघटनेची वर्गणी वेतनातून कपात करण्यासाठी संमतीपत्रे प्रशासनास दिली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात संघटनेने दिलेल्या सदस्यांच्या यादीनुसार, प्रशासनाने त्यांची वर्गणी संघटनेला दिली असली तरी, या कर्मचाऱ्यांनी मात्र, संमती पत्र दिलेले नसल्याने त्यांची वर्गणीही कपात करण्यात आली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर होता.

तसेच काही कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्याबाबत तक्रारीही केल्या होत्या. त्यामुळे या वर्षी वर्गणी वरून वाद तसेच कर्मचाऱ्यांची नाराजी नको म्हणून आयुक्त कुणाल कुमार यांनीच वर्गणीच्या प्रस्तावास मान्यता देतानाच; वर्गणी कपात करताना, कर्मचाऱ्याचे संमती पत्रक संबधित विभागाकडे असणे बंधनकारक केले आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी वर्गणी कपात करू नये, असे लेखी कळविले आहे. त्यांच्या वेतनातून कपात करू नये असे नमूद केले आहे. या शिवाय, संमतीपत्र न घेता वर्गणी कपात केली गेल्यास वेतनपत्र लेखनिकांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारही या प्रस्तावात देण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)