कर्मचारी मृत्यू प्रकरणी चौकशी करावी

पिंपरी – महापालिकेत शिपाई असलेल्या रमेश बबन हरेल यांचा ड्युटीवर असताना मुळशी डॅममध्ये पाण्यात बुडून मृत्यू झाला. ते ड्युटीवर असताना तिथे गेले कसे याची कसून चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते पांडूरंग परचंडराव यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असून घातपाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनसंपर्क विभागातील इतर कर्मचाऱ्यांची कसून चौकशी करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. परचंडराव यांनी जनसंपर्क विभागातील हजेरीबाबत माहिती अधिकारात माहिती मागवली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामध्ये अनेक बाबी संशयास्पद आहेत. रमेश हरेल यांच्यासह अन्य एका लिपिकाने सकाळी “इन’ केले. मात्र, संध्याकाळी “आऊट’ केलेले नाही. यावरुन महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी हजेरी लावून गायब होत असल्याचे स्पष्ट होत आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक असून रमेश हरेल यांच्या घातपाताची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)