कर्नाटक विधानसभेत अँग्लो इंडियन सदस्याच्या नियुक्‍तीवरून वाद

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभेमध्ये राज्यपालांकडून अँग्लो इंडियन सदस्याला नामनिर्देशित करण्याविरोधात कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध केले जाईपर्यंत राज्यपालांकडून नामनिर्देशित सदस्यांची नियुक्‍ती केली जाऊ नये अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

या याचिकेवर उद्या दुपारी सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. काल रात्री दाखल करण्यात आलेल्या याचिकेचा भाग म्हणून ही मागणी केली गेली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने काल रात्रीच्या सुनावणीमध्ये केवळ बी.एस. येडियुरप्पा यांच्या शपथविधीच्या स्थगितीबाबतच सुनावणी केली होती.

त्यामुळे कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने नव्याने याचिका दाखल केली आणि बहुमत सिद्ध होईपर्यंत राज्यपालांकडून नामनिर्देशित अँग्लो इंडियन सदस्यांची विधानसभेत नियुक्ती केली जाऊ नये अशी मागणी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)