कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार असून 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत ईव्हीएम मशिन्ससोबतच व्हीव्हीपॅट मशिन्सचाही वापर होणार आहे.

कर्नाटक हे काँग्रेसची सत्ता असलेल्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे काँग्रेसच्यादृष्टीने ही अस्तित्त्वाची लढाई मानली जात आहे. तर आपल्या काँग्रेसमुक्त भारत या ध्येयाच्या आणखी जवळ जाण्यासाठी या निवडणुकीत भाजपाकडून संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आली आहे.

224 सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 28 मे रोजी पूर्ण होत आहे. कर्नाटकात सध्या 122 आमदारांसह काँग्रेस सत्तेत आहे. निवडणूक आयोगाने तारीख जाहीर करण्यापूर्वीपासूनच सर्व राजकीय पक्षांचा जोरात प्रचार सुरु आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह सध्या दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर आहेत. तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विविध टप्प्यांमध्ये प्रचार करत आहेत. काँग्रेसकडून मुख्यमंत्री सिद्धरामैय्या, तर भाजपकडून बीएस येडियुरप्पा मैदानात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
20 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)