कर्नाटक विधानसभा ; केदारनाथ दर्शनानंतर पंतप्रधान मोदी उतरणार प्रचारात

नवी दिल्ली : भाजप आणि कॉंग्रेस यांच्यासाठी करा किंवा मरा अशी लढाई सध्या कर्नाटकात निर्माण झाली आहे. यासाठी दोन्ही पक्ष आपल्या शक्तीनिशी मैदानात उतरले आहेत. दरम्यान, आता या रणसंग्रामात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लवकरच उतरणार आहेत. उत्तराखंडमध्ये केदारनाथाचे दर्शन घेऊन मोदी राज्यातील प्रचारात उतरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

येत्या १ मेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटक विधानसभेच्या प्रचारात उतरणार आहेत. दरम्यान, बेळगाव, उड्डपी आणि चाराजामामध्ये मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेची मागणी पक्षाकडून जास्त प्रमाणात करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांच्या २० तर मोदींच्या १५ रोड शो आयोजन करण्यात आले आहे. तसेच मोदींच्या १५ रोड शो द्वारे संपूर्ण कर्नाटक व्यापाले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रचारात मोदी हिंदुत्व आणि लिंगायत धर्माचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)