कर्नाटक: येडियुरप्पांचा फैसला, सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

कर्नाटक – कर्नाटक राज्यात सत्ता स्थापनेवरुन वाद निर्माण झाला आहे. याबाबत सुप्रीम कोर्टात आज सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार असल्याने हा पेच सुटण्याची शक्‍यता आहे. तसेच मुख्यमंत्री येडियुरप्पा किती काळ आपल्या पदावर टिकून राहतात हे स्पष्ट होणार आहे.

कॉंग्रेसने सुप्रीम कोर्टात येडियुरप्पांचा असंविधानिक पद्धतीने होणारा शपथविधी रोखण्यात यावा या मागणीसाठी धाव घेतली होती. राज्यपालांचा विशेषाधिकार असल्याने त्यांच्या निर्णयाविरोधात जाऊन आम्ही येडियुरप्पांचा शपथविधी रोखू शकत नाही, मात्र, त्यावर सुनावणी घेण्यात येईल असे 17 तारखेला मध्यरात्री न्यायालाने स्पष्ट केले होते. येडियुरप्पांना बहुमताचा आकडा दाखवणाऱ्या आमदारांच्या नावांची यादी आज कोर्टात सादर करावी लागणार आहे. ही यादी जर ते सादर करु शकले नाहीत तर त्यांची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद धोक्‍यात येऊ शकते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)