कर्नाटक निवडणूक : आयकर विभागाच्या छाप्यात ४ कोटींची रोकड जप्त

बंगळूरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या जशा जवळ येत आहेत, तसे राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. तर दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोग आणि आयकर विभाग देखील कामाला लागला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने बंगळूरूमधून शनिवारी ४ कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. बंगळूरूमधील तीन कंत्राटदारांकडून ही रोकड जप्त केली असून रुपये २ कोटींचे दागिने देखील विभागाने जप्त केले आहे.

बंगळूरूमधील तीन वेगवेगळ्या कंत्राटदारांच्या घरी विभागाने छापा टाकला. यामध्ये एकूण ४.०१ कोटी रुपयांची रोख रक्कम आणि २.२० कोटी रुपयांचे दागिने असा मुद्देमाल विभागाच्या हाती लागला. याविषयी विचारणा केली असता तसेच याचा तपशील मागितला असता, या तिन्ही कंत्राटदारांना तो देता आला नाही. त्यामुळे विभागाने हा सर्व मुद्देमाल जप्त करत, या तिन्ही कंत्राटदारांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, कर्नाटक विधानसभेसाठी १२ मे रोजी मतदान होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)