कर्नाटक निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा तयार करा – राहुल गांधी

राहुल यांची कॉंग्रेस नेत्यांना सूचना
नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जनतेचा जाहीरनामा तयार करण्याची सूचना कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी कर्नाटकमधील पक्षाच्या नेत्यांना केली आहे. कर्नाटकात चालू वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे.
गुजरातच्या धर्तीवर कॉंग्रेस कर्नाटकमध्येही जनतेच्या जाहीरनाम्याची संकल्पना राबवणार आहे.

गुजरातमधील विधानसभा निवडणुकीवेळी प्रसिद्ध तंत्रज्ञ सॅम पित्रोदा यांनी कॉंग्रेसच्या वतीने त्या राज्याच्या पाच शहरांमधील नागरिकांशी संवाद साधला होता. त्याआधारे कॉंग्रेसचा जाहीरनामा बनवण्यात आला. आता कर्नाटकमध्येही कॉंग्रेस तीच पद्धत अवलंबणार आहे. त्या राज्यात जनतेशी संवाद साधण्याची जबाबदारी ज्येष्ठ नेते वीरप्पा मोईली यांच्या नेतृत्वाखालील टीमवर सोपवण्यात आली आहे. कर्नाटकात जनसंपर्क अभियान हाती घेण्याची सूचनाही राहुल यांनी कॉंग्रेस नेत्यांना केली आहे.

-Ads-

कर्नाटकमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. त्या पक्षाकडून सत्ता खेचून घेण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यामुळे कर्नाटकमधील आगामी निवडणुकीला राजकीयदृष्ट्या अंत्यत महत्व प्राप्त झाले आहे. त्या राज्यात माजी पंतप्रधान एच.डी.देवगौडा यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलाचीही (जेडीएस) मोठी ताकद आहे. त्यामुळे आगामी निवडणूक तिरंगी होण्याची शक्‍यता आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)