कर्नाटक निवडणुकीची तारीख फुटली; चौकशीसाठी समिती स्थापन

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यापूर्वीच ती फुटली. त्यामुळे वादंग निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर तारीख फुटल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली.

यासंदर्भात निवडणूक आयोगाने जारी केलेल्या निवेदनात भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांच्या ट्‌विटचा संदर्भ दिला. मुख्य निवडणूक आयुक्त ओ.पी.रावत यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर करण्यापूर्वीच मालवीय यांनी तारखेचा उल्लेख केला. मतदानाची तारीख त्यांनी बरोबर दिली. मात्र, मतमोजणी 18 मे यादिवशी होईल, असे म्हटले.

निवडणुकीची तारीख नमूद करताना त्यांनी एका वृत्त वाहिनीचा हवाला दिला. निवडणूक तारीख फुटल्यावरून इतर राजकीय पक्षांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यानंतर भाजपने कर्नाटकमधील एका कॉंग्रेस नेत्यानेही तारीख फोडल्याचा आरोप केला. आता निवडणूक आयोगाने समितीला चौकशी करून आठवडाभरात अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)