कर्नाटकात भाजपची पैशाची ताकद चालणार नाही 

कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांचे प्रतिपादन 
नवी दिल्ली – कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे. तेथील सरकारच्या विरोधात जनतेची कोणतीही नाराजी नाही. या उलट भारतीय जनता पक्षाची स्थिती असून त्यांची पैशाची ताकद तेथे चालणार नाही असे प्रतिपादन ज्येष्ठ कॉंग्रेस नेते वीरप्पा मोईली यांनी केले आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या संबंधात पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की वादग्रत व भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या रेड्डुी बंधुंपैकी एकाला पुन्हा भाजपने बेल्लारीतून तिकीट दिले आहे त्यातून भाजपची अगतिकता दिसून आली असून आपला पक्ष अडचणीत असल्याचीच कबुली त्यांनी या कृतीतून दिली आहे. कर्नाटकात आम्हाला पुर्ण विजयाची खात्री आहे. तथापी कोणतीही निवडणूक गृहीत धरून चालत नाही. तेथे प्रत्येक जागेसाठी लढावे लागते. कर्नाटकातही प्रत्येक मतदार संघात जोरदार तिहेरी लढत होईल पण कॉंग्रेसलाच तेथे विजय मिळेल असा दावाही त्यांनी केला. कॉंग्रेसला बहुमत प्राप्त होईल अशी आम्हाला खात्री असल्याने जेडीएसची मदत घेण्याची तेथे वेळ येणार नाहीं असा दावाही त्यांनी केला.

-Ads-

कॉंग्रेसने 2004 च्या निवडणुकीत जेडीएसशी हातमिळवणी करून आघाडीचे सरकार चालवले होते पण हे सरकार जेमतेम 20 महिनेच चालले होते. या पार्श्‍वभूमीवर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नाला त्यांनी वरील उत्तर दिले. भाजपची पैशाची ताकद आणि कल्पनेचा खेळ कर्नाटकात चालणार नाही असेही त्यांनी निक्षुन सांगितले. सध्याच्या वातावरणात मोदींची लाट नाहीशी झाली आहे. त्यांची विश्‍वासार्हता पुर्ण लयाला गेली आहे. निवडणुक प्रचारात ते जे काहीं बोलतात तो केवळ एक निवडणूक जुमला असतो असे आता सर्वांना ठाऊक झाले आहे असेही मोईली यांनी यावेळी नमूद केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)