बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ८२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात लिंगायत समाजातील ३१ जणांना तिकीट देण्यात आले आहे. लिंगायत मतांवर डोळा ठेऊन भाजपने तिकीट वाटपात लिंगायतांना झुकते माप दिल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. दरम्यान, येडियुरप्पा यांना शिकारीपुरामधून उमेदवारी देण्यात आली आहे तसेच अवैध खाणींमुळे चर्चेत आलेले जनार्दन रेड्डी यांचे बंधू सोमशेखर रेड्डी यांनाही भाजपने तिकीट दिले आहे.

भाजपने ९ एप्रिल रोजी ७२ आणि आज आणखी ८२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. आजच्या यादीत ३१ उमेदवार लिंगायत समाजातील असल्याचे एका वर्तमानपत्रात म्हटले आहे. भाजपच्या दुसऱ्या यादीत मतांचे गणित लक्षात घेऊन तिकीट वाटप करण्यात आले आहे. म्हैसूरमध्ये वोक्कालिगा समाजाचं प्राबल्य असून या भागातील उमेदवारीत या समाजाला प्राधान्य देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)