कर्नाटकात बस कॅनॉल मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत 25 ठार 

बंगळुरू: कर्नाटकात मंड्या जिल्ह्यात एक बस कॅनॉल मध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत 25 जण ठार झाले आहेत. यात अनेक शालेय विद्यार्थी आहेत. पांडवपुरा तालुक्‍यातील कनकानमारदी येथे ही दुर्घटना घडली. ही बस मंड्याहून पांडवपुरा कडे चालली होती. चालकाचा बस वरील ताबा सुटल्यानंतर ती थेट कॅनाल मध्ये कोसळली. ही बस कॅनालच्या पाण्यात पुर्ण बुडाली त्यामुळे जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

बस मध्ये शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात होते यातील बहुतेक जण शाळेला अर्धी सुट्टी मिळाल्यामुळे घरी निघाले होते. घटनास्थळी प्रशासन यंत्रणा त्वरीत दाखल झाली आहे. मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले आहे. ते स्वत: घटनास्थळी रवाना झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना मदत कार्यात लक्ष घालण्याची सुचना केली. बस मध्ये 30 ते 35 जण होते असे सांगण्यात येत आहे. अपघाताचे ठिकाण बंगळुरूपासून 105 किमी अंतरावर आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
1 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)