कर्नाटकात फक्त 800 शेतकऱ्यांनाच कर्जमाफी

विधानसभेत सहकारमंत्री बंडेप्पा कशेमपूर यांचीच माहिती

बंगळुरू: कर्नाटकात सत्तेवर येताच कुमारस्वामी यांनी शेतकऱ्यांसाठी 44 हजार कोटी रूपयांची कर्जमाफीची घोषणा केली होती. घोषणेच्या चार महिन्यानंतर राज्यातील मूठभर शेतकऱ्यांनाच (फक्त 800) याचा लाभ झाला असल्याचे खुद्द कर्नाटक सरकारनेच कबुल केले आहे. कर्नाटक विधानसभेत सहकारमंत्री बंडेप्पा कशेमपूर यांनी शेतकरी कर्जमाफीविषयी माहिती दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कशेमपूर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी 5 जुलै रोजी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा आतापर्यंत केवळ आठशे शेतकऱ्यांनाच लाभ झाला आहे. सहकारी बॅंकातून कर्ज घेतलेल्या 20 लाख शेतकऱ्यांसह उर्वरित राष्ट्रीयकृत बॅंकांतून 43 लाख अर्ज कर्जमाफीसाठी येतील, असा अंदाज सरकारला होता. त्यानंतर व्यापारी आणि जिल्हा बॅंकांनाही माहिती देण्यास सांगण्यात आले होते. शेतकरी आणि बॅंका आणि सादर केलेल्या दुहेरी माहितीची अंतिम यादी (ग्रीन लिस्ट) करण्यापूर्वी उलटतपासणी करण्यात आली. योजनेची अंमलबजावणी धिम्या गतीने होत असल्यानेच दुसरी यादी (ग्रीन लिस्ट) तयार करण्यात विलंब होत आहे. निधी नसल्यामुळे योजनेला विलंब होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कुमारस्वामी यांच्या पक्षाने जाहीरनामा आणि प्रचार सभांमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर 24 तासात कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल, असेही कुमारस्वामी यांनी म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)