कर्नाटकात ‘त्या’ खात्यांवरून चढाओढ ; दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर काँग्रेस ठाम

नवी दिल्ली : कर्नाटकातल्या जेडीएस आणि काँग्रेसमधल्या खातेवाटपावरून स्पर्धा अद्यापही सुरूच आहे. विशेष म्हणजे काँग्रेस दोन उपमुख्यमंत्र्यांच्या मागणीवर अद्यापही ठाम आहे. तसेच ते दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या पक्षाकडूनच व्हावेत, अशीही काँग्रेसची इच्छा आहे. परंतु कुमारस्वामी त्यासाठी तयार नाहीत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासोबत जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्याच वेळी काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खातेवाटपावरून चढाओढ सुरू झाली.

खातेवाटपाबाबत काँग्रेससोबत मतभेद असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी जाहीरपणे सांगितले.  मात्र, याचवेळी सरकारला कोणताही धोका नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले की, ‘काही खात्यांबाबतीत काँग्रेससोबत आमचे मतभेद आहेत. मात्र याचा सरकारला कोणताही धोका नाही. हा मुद्दा आम्ही प्रतिष्ठेचा बनवणार नाही. संबंधित विषय फार न ताणता त्यावर तोडगा काढला जाईल.

राज्यातील काँग्रेस नेत्यांना पक्षाच्या अध्यक्षांची मंजुरी मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी परमेश्वर, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांच्यासहीत काँग्रेसचे अन्य नेतेमंडळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधींसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे. कर्नाटकात दोन दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-जनता दल सरकारने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)