कर्नाटकात जनता दल एसचे सात माजी आमदार कॉंग्रेस मध्ये

म्हैसुर – कर्नाटाकातील धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या सात माजी आमदारांनी काल कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यामुळे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या अध्यक्षतेखालील पक्षाला मोठाच धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या या पक्षांतराला राजकीयदृष्ट्या फार महत्व दिले जात आहे. हे आमदार मावळत्या विधानसभेचे सदस्य आहेत. त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.

या आमदारांनी राज्यसभेच्या निवडणुकीतही पक्षाचे आदेश झुगारून कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतदान केले होते. त्यावेळीच त्यांची ही बंडखोरी उघड झाली होती. त्यांनी केलेल्या मतदानामुळे या विधानसभेत कॉंग्रेसचा तिसरा उमेदवारही राज्यसभेवर निवडून आला. हा कॉंग्रेसला बोनस ठरला. निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत धर्मनिरपेक्ष जनता दलाने मतदान सुरू असतानाच राज्यसभा निवडणुकीवर बहिष्कार घातला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)