बंगळूरू : जनता दल (सेक्युलर)चे एच. डी. कुमारस्वामी यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. जेडीएस-काँग्रेस आघाडीचे ११७ आमदार असल्याने बहुमत सिद्ध करू, असा विश्वास कुमारस्वामी यांनी व्यक्त केला आहे.

कर्नाटकच्या विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून एस. सुरेशकुमार यांनी तर काँग्रेसकडून रमेशकुमार यांनी अर्ज भरला आहे. यामुळे अध्यक्षपदाच्या निवडीवरही सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, याआधी भाजपचे बी.एस.येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र त्यांनी बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यामुळे राज्यपालांनी कुमारस्वामी यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)