कर्नाटकात एकाच टप्प्यात सर्व उमेदवार जाहीर करणार – कॉंग्रेस

बंगळुरू – कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस पक्षातर्फे एकाच टप्यात 15 एप्रिल पर्यंत सर्व उमेदवार घोषित केले जाणार आहेत अशी माहिती प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जी परमेश्‍वर यांनी आज पत्रकारांना सांगितली. राज्यात 12 मे रोजी विधानसभेचे मतदान होणार आहे.

9 आणि 10 एप्रिल रोजी प्रदेश पातळीवर स्क्रीनिंग समितीची बैठक होईल. त्यात उमेदवारांची प्राथमिक यादी तयार केली जाईल आणि दिल्लीत मध्यवर्ती निवडणुक समितीत सर्व 224 उमेदवार 15 एप्रिलच्या आत निश्‍चीत केले जातील असे ते म्हणाले. सध्या प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमत्र्यांनी उमेदवार निश्‍चीत आणि निवडणूक जाहीरनामा निश्‍चीतीसाठी बैठकांचे सत्र सुरू केले आहे.

उमेदवार निश्‍चीत करण्यासाठी जिल्हा पातळीवरील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशीही चर्चा केली जात आहे असे त्यांनी नमूद केले. कॉंग्रेसने राज्यात भाजपला प्रभावी टक्कर देण्यासाठी प्रचाराचीही मोठी रणनिती आखली असून राज्यभरातील प्रचारासाठी चाळीस स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली आहे. हे काम कॉंग्रेसचे प्रदेश प्रभारी के. सी वेणुगोपाल यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)