कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत कॉंग्रेसची सरशी

File photo

कॉंग्रेस 982, भाजप 929 आणि धर्मनिरपेक्ष जनता दल 375 जागांवर विजयी
बेंगळूरु – कर्नाटकातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अटितटीने झालेल्या निवडणूकीमध्ये कॉंग्रेसची सरशी झाली आहे. एकूण 2, 662 जागांपैकी कॉंग्रेसने 982 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामध्ये उत्तरेकडील भागांचे प्रमाण अधिक आहे. भाजपने या निवडणूकीमध्ये 929 जागा तर धर्मनिरपेक्ष जनता दलाने 375 जागांवर विजय मिळवला आहे.

उर्वरित जागांवर अपक्ष आणि अन्य स्थानिक गटांनी विजय मिळवला आहे. राज्यामध्ये कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाची आघाडी सत्तेवर असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले होते. या दोन्ही पक्षांनी निवडणूकीनंतर आघाडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे.

बेंगळूरुमधील जनता नेहमी भाजपच्या बाजूने मतदान करते. मात्र यावेळी बेंगळूरुतील जनतेने राज्यातील जेडीएस आणि कॉंग्रेस आघाडी सरकारच्या बाजूने मतदान केले आहे. याचाच अर्थ राज्यातील सरकारच्या कारभारावर जनतेचा विश्‍वास असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी व्यक्‍त केली आहे.

या निवडणूक निकालांबाबत जेडीएसचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी समाधान व्यक्‍त केले आहे. भाजपला दूर ठेवण्यासाठी जेडीएस आणि कॉंग्रेस आघाडी एकत्रित कार्यरत राहील, असे ते म्हणाले.

कॉंग्रेसचे प्रवक्‍ते रणदीप सुर्जेवाला यांनीही या विजयाबद्दल कर्नाटकमधील कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. कर्नाटकातील जनतेने “भाजपचा जुमला’ नाकारला आहे आणि कर्नाटकातील शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेसला क्रमांक 1 चा पक्ष बनवला असल्याचे चित्र यामुळे स्पष्ट झाले आहे. राज्यातील विकासाच्या धोरणांना राज्यातील जनतेने स्वीकारले आहे, असे ते म्हणाले.

भाजपच्या पराभवाला आघाडीच जबाबदार असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस. येडियुरप्पा यांनी केली आहे. जेडिएस आणि कॉंग्रेसच्या आघाडीमुळेच भाजप अपेक्षित कामगिरी करू शकला नाही, असे ते म्हणाले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूकीमध्ये भाजपला अपेक्षित यश नक्की मिळेल, असा विश्‍वासही येडियुरप्पा यांनी व्यक्‍त केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)