कर्नाटकातील दुचाकी चोरटा जेरबंद

सातारा एलसीबीची कारवाई; आठ दुचाकी हस्तगत
सातारा,दि.12 (प्रतिनिधी)
कराड तालुका परिसरात दुचाकी चोरून त्या जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात विकणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून आठ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. अकिब इमाम हुसेन सय्यद (रा. बेळगाव कर्नाटक) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कराड तालुक्‍यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख,अप्पर अधीक्षक विजय पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कारवाईच्या सुचना दिल्या होत्या.

-Ads-

त्युानसार पो.नि.पद्माकर घनवट यांनी स.पो.नि. विकास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नेमुन आरोपीच्या शोधार्थ पाठवले होते. मिळालेल्या सुचनेनुसारा जाधव यांनी कराड शहर व परिसरात दुचाकी चोर, व चोरीच्या गाड्या वापरणाऱ्यांची माहिती संकलीत केली.

त्यानंतर कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे सापळा लावत आरोपीच्या मुसक्‍या आवळल्या. त्याच्याकडून बुलेट,ऍक्‍टीव्हा,डिओ अशा साडे सहा लाखाच्या आठ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. दरम्यान या चोरट्याकडून अजुन काही दुचाकी चोरीचे गुन्हे निष्पन्न होण्याची शक्‍यता आहे.

त्यामुळे ज्यांच्या दुचाकी चोरी गेल्या आहेत. त्यांनी कराड शहर पोलिस ठाण्याशी करावा असे अवाहन पोलिसांनी केले आहे. या कारवाईत स.पो.नि.विकास जाधव, सहा.फौजदार सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे,पृथ्वीराज घोरपडे,उत्तम दबडे,संतोष पवार,शरद बेबले,प्रमोद सावंत,प्रवीण फडतरे,मुबीण मुलाणी,नितीन गोगावले,निलेश काटकर,मयुर देशमुख,मोहसीन मोमीन,संजय सावंत,विजय सावंत यांनी सहभाग घेतला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)