कर्नाटकातील जेडीएसचे चार आमदार कॉंग्रेसच्या वाटेवर

बंगळूर – माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जेडीएसला आज ऐन कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्का बसला. त्या पक्षाच्या चार बंडखोर आमदारांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते कॉंग्रेसच्या वाटेवर असल्याचे समजते.

आर.अखंडा श्रीनिवासमुर्ती, एन.चालूवराया स्वामी, भीमा नाईक आणि बी.झेड.जमीर अहमद खान अशी आमदारकी सोडलेल्या आमदारांची नावे आहेत. जेडीएसच्या सात बंडखोर आमदारांमध्ये त्यांचा समावेश आहे. या बंडखोर आमदारांनी शुक्रवारी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कर्नाटकातील सत्तारूढ कॉंग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे कॉंग्रेसला बोनसच्या रूपात राज्यसभेची तिसरी जागा मिळाली. खरेतर, राज्य विधानसभेतील संख्याबळ पाहता कॉंग्रेसच्या वाट्याला राज्यसभेच्या दोनच जागा येणार होत्या. दरम्यान, विधानसभा सदस्यत्व सोडलेले चार आमदार येत्या दोन दिवसांत कॉंग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्‍यता आहे.

बंडाचे निशाण फडकावताना त्यांनी देवेगौडा यांचे पुत्र आणि जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. कुमारस्वामी यांचा कारभार एककल्ली आहे. ते वडिलांचा आणि मोठे बंधू एच.डी.रेवण्णा यांचाही सल्ला घेत नाहीत. आमची बाजू ते ऐकून घेतील का, असा सवाल त्यांनी भूमिका मांडताना केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)