कर्नाटकातील जयनगर मध्ये कॉंग्रेस विजयी

बंगळुरू – कर्नाटकातील जयनगर विधानसभा मतदार संघाची निवडणूक कॉंग्रेसने जिंकली आहे. 12 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपचे उमेदवार बी. एन. विजयकुमार यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. तेथे झालेल्या निवडणूकीत कॉंग्रेसच्या सौम्या रेड्डी यांनी भाजपचे बी. एन प्रल्हाद यांचा सुमारे 2800 मतांनी पराभव केला. सौम्या रेड्डी यांना 54457, तर प्रल्हाद यांना 51,568 मते मिळाली. भाजपने आपले दिवंगत उमेदवार प्रल्हाद यांचे बंधु विजयकुमार यांना तेथे उमेदवारी दिली होती. तर सौम्या रेड्डी या ज्येष्ठ कॉंग्रेस नेते रामलिंग रेड्डी यांच्या कन्या आहेत.

या निवडणुकीत जेडीएसने आपला उमेदवार उभा न करता कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. राज्यात जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रथमच ही निवडणूक झाली. या आधी राजाराजेश्‍वर नगर विधानसभा मतदार संघात झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि जेडीएस यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले होते. तथापी तेथेही कॉंग्रेसचेच मुनीरथना हे विजयी झाले त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आणि जेडीएसचा उमेदवार तेथे तिसऱ्या स्थानावर गेला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)