कर्नाटकमध्ये वेगवान घडामोडी… बंगळूर बनले केंद्रस्थान…

दुपारी 12.15-भाजप विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी बी.एस.येडियुरप्पा यांची निवड. राज्यपालांची भेट घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी पाचारण करण्याची विनंती.


दुपारी 12.15-जेडीएस विधिमंडळ पक्षनेतेपदी एच.डी.कुमारस्वामी यांची निवड.


दुपारी 12.40-कुमारस्वामी यांच्याकडून भाजपवर घोडेबाजाराचा आरोप. जेडीएसच्या आमदारांना फुटण्यासाठी 100 कोटींची ऑफर दिल्याचेही वक्तव्य.


दुपारी 1.55-केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी कुमारस्वामींचा आरोप फेटाळला.


दुपारी 2.05-पंतप्रधान नरेंद्र मोदी घोडेबाजाराला प्रोत्साहन देत असल्याचा मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आरोप.


दुपारी 2.15-कॉंग्रेस-जेडीएस आघाडीकडे बहुमत असल्याने राज्यपालांनी सरकार स्थापनेची संधी द्यायला हवी: सिद्धरामय्यांचे वक्तव्य.


सायंकाळी 5.50-कॉंग्रेस-जेडीएस शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट. पाठिंबा असलेल्या 117 आमदारांची यादी सादर.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)