‘त्या’ कार्यकर्त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ – अमित शहा

बंगरुळु – कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, भाजपने कर्नाटकमध्ये प्रचाराला सुरुवात केलीये. याचाच एक भाग म्हणून, भाजपा अध्यक्ष अमित शहा आजपासून कर्नाटक दौऱ्यावर आहेत. दरम्यान  काँग्रेसच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपाच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) जवळपास २४ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा आरोप आज भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी कर्नाटकमध्ये केला.

अमित शाह दोन दिवसांच्या कर्नाटक दौ-यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी २४ कार्यकर्त्यांची हत्या झाली, मात्र कारवाई करण्यात पोलीस अपयशी  ठरल्याचं देखील म्हंटलं आहे. पुढे बोलताना शहा म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या भाजपा आणि आरएसएस कार्यकर्त्यांच्या हत्येचा मी निषेध करतो. २४ पेक्षा अधिक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून, हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. सर्व आरोपी मोकाट फिरत आहेत. सिद्धरमय्या सरकारचा शेवट जवळ आला आहे, कर्नाटकमध्ये भाजप सत्तेत आल्यास या कार्यकर्त्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)