कर्नाटकबाबत हिंदू महासभेच्या याचिकेवर त्वरित सुनावणी नाही

नवी दिल्ली – कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दल आणि कॉंग्रेस आघाडीला सरकार बनवण्यासाठी पाचारण करण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात हिंदू महासभेने दाखल केलेल्या याचिकेवर त्वरित सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम. खानविलकर आणि न्या. नवीन सिन्हा यांच्या पिठासमोर हे प्रकरण त्वरित सुनावणीसाठी आले होते. मात्र न्यायालयाने त्वरित सुनावणीची मागणी अमान्य केली आणि याचिकेवर नियमित सुनावणी केली जाईल, असे स्पष्ट केले.

आज सकाळच्या सत्रात हे प्रकरण सुनावणीसाठी आले असता संबंधित याचिकाकर्ते हे अखिल भारतीय हिंदू महासभेशी संबंधित नसल्याचा आरोप अन्य वकिलांनी केला. त्यामुळे सर्वप्रथम मूळ संघटना कोणती आहे, हे निश्‍चित करावे असे न्यायालयाने सांगितले.

दुपारच्या सत्रामध्ये हिंदू महासभेच्यावतीने रिट याचिका दाखल केली. मात्र रिट याचिका कशी काय दाखल केली, असा प्रश्‍न न्यायालयाने विचारला. त्यावर अखिल भारतीय हिंदू महासभा ही राजकीय संघटना असून कर्नाटकच्या राज्यपालांच्या बेकायदेशीर कृतीला आक्षेप घेण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आल्याचे सांगितले गेले.

जेडीएस आणि कॉंग्रेस यांची निवडणूकीनंतरची आघाडी म्हणजे फ्रॉड असून राज्यघटनेचे उल्लंघन करणारी असल्याचेही संघटनेच्या वकिलांनी सांगितले. मात्र न्यायालयाने या याचिकेवर त्वरित सुनावणीस नकार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)