कर्नाटकच्या स्वतंत्र ध्वजाच्या प्रस्तावावर भाजपचे मौन का? – कॉंग्रेस

कॉंग्रेसचा सवाल
बंगलुरू – कर्नाटकातील कॉंग्रेस सरकारने राज्याचा स्वतंत्र ध्वज असावा असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असून त्या ध्वजाचे काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अनावरणही करण्यात आले आहे तथापी भाजपने मात्र त्यावर आपली प्रतिक्रीया दिलेली नाही. त्यांनी याबाबत मौंन का धरले आहे असा सवाल आता कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित केला आहे.

या ध्वजाला मंजुरी मिळवण्यासाठी भाजपचे कर्नाटकचे खासदार दिल्लीतील आपल्याच पक्षाच्या सरकारवर दबाव टाकणार की नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. हा ध्वज म्हणजे कन्नडी नागरीकांच्या अस्मितेचे प्रतिक आहे त्याला भाजपचे समर्थन मिळायला हवे होते पण ते का मिळत नाही असा सवाल प्रदेश कॉंग्रेसच्यावतीने उपस्थित करण्यात आला आहे.

-Ads-

कर्नाटकातील भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी या विषयावर आपली प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की राज्याचा स्वतंत्र ध्वज असावा ही संकल्पना आम्हाला मान्य आहे त्याला आमचा विरोध नाही पण त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना विश्‍वासात न घेताच परस्पर समिती स्थापन करून एकतर्फीच हा निर्णय घेतला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)