कर्नाटकच्या शेतकऱ्यांची नारायणगाव उपकेंद्राला भेट

नारायणगाव- कर्नाटक राज्यातील कडुर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील शेतकऱ्यांनी नारायणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपकेंद्राला आज (दि. 22) भेट दिली.
कर्नाटक राज्यातील कडुर तालुक्‍यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 90 शेतकरी आणि महिला, ग्रीन इनोव्हेशन सेंटरचे धनंजय, रंगनाथ बाबू, संजीव राठोड आदींनी तीन दिवसीय कृषी अभ्यास दौऱ्यावर महाराष्ट्रात नाशिक, जुन्नर तालुका या ठिकाणी असणारे शेतकरी, बाजार समिती, कृषी फार्म यांना भेटी देऊन शेतीची माहिती, महाराष्ट्रातील शेतीचे ज्ञान, बाजार समितीतील कामकाज, व्यापारी, अडतदार आदींची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे, व्यवस्थापक शरद धोंगडे, अडतदार सारंग घोलप यांनी सर्वांचे स्वागत करून बाजार समितीतील कामकाज, बाजार समितीमध्ये येणारे टोमॅटो, कोंथिबीर, मेथी आणि इतर तालुक्‍यांतील उपकेंद्रातील भाजीपाला, फळे, इतर शेतीमालांची माहिती दिली. जुन्नर बाजार समितीच्या कामकाजाविषयी शेतकऱ्यांनी प्रत्यक्षच मार्केटमध्ये जाऊन माहिती घेतली असता शेतकरी, व्यापारी, बाजार समितीचे कौतुक केले. बाजार समितीचे उपसभापती दिलीप डुंबरे, संचालक निवृत्ती काळे यांनी शेतकऱ्यांसमवेत टोमॅटो आणि भाजीपाला मार्केटला नेऊन कोडूरच्या शेतकऱ्यांना शेतकरी आणि बाजार समितीचे कामकाज कसे चालते, याची माहिती दिली .

  • कर्नाटकातील कडुर तालुक्‍यातील कडुर कृषी उत्पन्न बाजार समिती आणि चिकमंगळूर येथील काही शेतकऱ्यांनी मागील वर्षी जुन्नर बाजार समितीला भेट दिली होती. त्यावेळी येथील शेतकरी व बाजार समितीच्या कामकाजाची, टोमॅटो मार्केटची माहिती घेतली होती. त्यानुसार कडुर कृषी उत्पन्न बाजार समितीने मागील वर्षीपासून टोमॅटो लागवडीवर भर देऊन शेतकरी आणि बाजार समितीने एकत्रित समन्वय करून जुन्नर तालुक्‍यातील बाजार समितीच्या माध्यमातून टोमॅटो व्यवसाय सुरू केला. तेथील शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे टोमॅटो पिकाच्या लागवडीमध्ये सुधारणा केल्याने पाच पट उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा झाला. नर्सरीमध्येही शेतकऱ्यांनी बदल करून उत्पादनात वाढ होऊन आर्थिक फायदा झाला आहे.
    – रंगनाथ बाबू, शेतकरी प्रतिनिधी, कोडूर
  • कडुर बाजार समितीने 800 शेतकऱ्यांचे गट तयार करून गटशेती सुरू केली आहे. तेथे बाजारभाव कमी असल्यास व्यापारी, अडतदार 10 टक्के असलेले कमिशन घेत नाहीत. कर्नाटकातील शेतकरी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवत नसल्याने शेतीमध्ये मागे आहेत. शेतीच्या प्रगतीसाठी येथे राजकीय इच्छाशक्ती कमी आहे, त्यामुळे बाजार समितीने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांत अभ्यास दौरे सुरू केले आहेत.
    – संजीव राठोड, शेतकरी प्रतिनिधी, कोडूर

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)