कर्नाटकच्या रिंगणात 2 हजार 655 उमेदवार

बंगळूर – कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यावेळी एकूण 2 हजार 655 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यात 2 हजार 436 पुरूष आणि 219 महिल उमेदवारांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीच्या (2013) तुलनेत यावेळी कमी उमेदवार रिंगणात आहेत. मागील वेळी 2 हजार 948 उमेदवारांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण 224 जागा आहेत. त्या राज्यात भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. त्याखालोखाल राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेस 222 तर जेडीएस 201 जागा लढवत आहे. बसपने 18, माकपने 19, राष्ट्रवादी कॉंग्रेसने 14 तर भाकपने 2 जागांवर उमेदवार दिले आहेत. कर्नाटकात विधानसभा निवडणुकीसाठी एकाच टप्प्यात 12 मे यादिवशी मतदान होईल. मतमोजणी 15 मे यादिवशी होणार आहे.

-Ads-

निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत शुक्रवारी समाप्त झाली. 583 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, तर 271 उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले. कर्नाटकच्या सत्तेसाठी कॉंग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये तिरंगी लढत होणार आहे. त्यातही कॉंग्रेस आणि भाजपमध्ये कॉंटे की टक्कर अपेक्षित आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)