कर्नाटकचे माजी खासदार ए.एच.विश्‍वनाथ यांचा कॉग्रेसला रामराम !

मैसुरू (कर्नाटक), दि. 20-कर्नाटकचे माजी खासदार ए एच विश्‍वनाथ यांनी कॉग्रेस सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मैसुरू येथे आपल्या समर्थकांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष जी परमेश्‍वर यांच्याकडे बेंगळुरू येथे आपण आठवडाभरात औपचारिक राजीनामा पत्र सुपूर्द करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
मात्र कॉग्रेस सोडल्यानंतर दुसऱ्या कोणत्या पक्षात सामील व्हायचे याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कॉग्रेस पक्षाला राम राम करण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी विश्‍वनाथ यांनी मुख्यमंत्री सिद्दरामैया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र आपण गेली 40 वर्षे काम केलेली कॉग्रेस ही आपल्यासाठी आपल्या मृत्युपर्यंत मातेसमानच असेल, असे जाहीर करताना ते म्हणाले, की मी सिद्दरामैया यांची कॉग्रेस सोडत आहे. सुमारे दशकभरापूर्वी सिद्दरामैया यांना कॉग्रेसमध्ये प्रवेश करू दिल्याबद्दल त्यांनी जाहीर खंत व्यक्त केली आहे. .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)