कर्त्या व्यक्तीच्या मृत्यू प्रकरणात कुटुंबीयांना दिलासा – 24 लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा महालोकअदालतमध्ये निर्णय

पुणे-क्रेनने धडक दिल्यामुळे घरातील कर्त्या व्यक्‍तीचा मृत्यू झाल्याप्रकरणात 24 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये हा दावा निकाली काढण्यात आला. विलास उत्तम गवारी (वय 42, रा. मोई, ता. खेड), असे अपघातात मृत्यू झालेल्यांचे नाव आहे. त्यांची पत्नी सारिका, मुली ऋतु (वय 9), वेदीका (2 वर्षे) आणि वयोवृद्ध आई यांनी या प्रकरणात नुकसानभरपाई मिळावी, यासाठी ऍड. कांचन धामणकर यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. विलास हे दि. 14 मे 2016 रोजी दुचाकीवरून पुणे – नाशिक द्रुतगती महामार्गावरून चालले होते. त्यावेळी खेड तालुक्‍यातील कुरूळी गावच्या हद्दीत रस्त्यावर एक घटना घडली होती. लोक जमून ते पाहते होते. हे पाहण्यासाठी त्यांनी गाडी लावली. ते घटनास्थळाकडे निघाले. त्यावेळी नाशिककडून पुण्याकडे निघालेल्या क्रेनने त्यांना धडक दिली. त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ते एका कंपनीत ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. त्यांना दरमहा 20 हजार रुपये पगार होता. घरातील एकमेव कमवते होते. त्यामुळे 28 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी ऍड. कांचन धामणकर यांच्यामार्फात मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या महालोकअदालतमध्ये 24 लाख रुपये देत दावा निकाली काढण्यात आला. विमा कंपनीच्या वतीने ऍड. एम. बी.माहेश्‍वरी यांनी काम पाहिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)