कर्तव्यात कसूर केल्याचा बापटांवर ठपका ; बापटांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश

औरंगाबाद: स्वस्त धान्य दुकानाच्या संबंधित एका निकालाच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ठेवला आहे. तसेच बापट यांनी घेतलेला निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

बीडच्या मुरंबी येथील रहिवाशी साहेबराव वाघमारे यांनी बिभीषण माने यांच्याविरोधात जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. माने यांचे स्वस्त धान्य दुकान आहे. मात्र ते शिधापत्रिकाधारकांना स्वस्त माल न देता तो काळ्या बाजारात विकतात, असा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची अंबाजोगाईच्या तहसीलदारांनी चौकशी केली. यात दुकानदार माने दोषी आढळल्याने त्यांचा परवाना रद्द करण्यात आला. तसेच जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीतही माने दोषी आढळले होते. हे प्रकरण अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे पोहोचले. बापट यांनी दुकानदार माने याला आणखी एक संधी देत परवाना बहाल केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर निकाल देताना खंडपीठाने नाराजी व्यक्त केली आहे. चौकशीनंतर कारवाई केली तर ती योग्य आहे आणि तो निर्णय मंत्र्यांनी का रद्द करावा हे कळत नाही, असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. गिरीष बापटांनी कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तसेच बापटांनी घेतलेला निर्णय न्यायालयाने रद्द केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)