कर्तव्याचे पालन केल्यास स्वातंत्र्याचा आनंद

भोसरी – प्रत्येक भारतीय नागरिकाने आपल्या कर्तव्याचे पालन प्राणपणाने व प्रामाणिकतेने केले तरच आपण स्वातंत्र्याचा खऱ्या अर्थाने आनंद उपभोगू शकतो. स्वातंत्र्यदिन भारतीय संस्कृतीत तसेच भारतात राहणाऱ्या सर्व बंधु-भगिनींसाठी गौरवशाली आहे. हा दिवस प्रत्येक भारतीयांमध्ये उत्साह संचार करणारा असतो, असे प्रतिपादन उप प्रर्वतनी साध्वी मंजुलज्योतिजी म. सा. यांनी चातुर्मास प्रवचनात केले.
त्या म्हणाल्या, संपूर्ण विश्‍वात आजचा दिवस अहिंसा, सत्य, शांती, पवित्रता आणि सदाचारासाठी प्रतिष्ठेचा मानला जातो. अहिंसेची खरी ओळख जगाला गांधीजींच्या रुपाने भारतीयांनीच करून दिली. धर्माचा विजय, सत्याचा विजयच मानवाला गौरव मिळून देतो.

या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, शहीद भगतसिंग, राजगुरु, स्वातंत्र्यवीर सावरकर, झाशीची राणी अशा लाखो ज्ञात-अज्ञात शूरवीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावून स्वातंत्र्य मिळवून दिले. या शूरवीरांना नतमस्तक होऊन त्यांच्या भावनांचा आदर करणे, हे संपूर्ण भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे. देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याला जे अधिकार मिळाले आहेत, त्या अधिकारांनी हुरळून न जाता आपले कर्तव्य बजावले पाहिजे. देश आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो, हे अधिक महत्त्वाचे आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्राचीन काळापासून हिंसा आणि अहिंसा, संयम आणि असंयम, ज्ञान आणि अज्ञान, सत्य आणि असत्य यामधील संघर्ष चालत आला आहे. परंतु जगामध्ये सत्याचाच विजय होतो. जेव्हा सत्याचा विजय होतो, तेव्हा-तेव्हा मानवी जीवनात शांती, सौजन्यता, प्रेम, बंधुभाव, शालीनता वाढते. मनुष्य लोककल्याणाच्या परोपकाराच्या मार्गावर नेहमी अग्रेसर राहतो. तुम्ही काम करत राहा. कुणी कामाची दखल घेतली नाही, तरी त्याने फारसा फरक पडत नाही. यश एक दिवस निश्‍चित मिळते, असेही त्या म्हणाल्या.

मंजुलज्योतिजी अमृतवाणी स्पर्धा
भोसरी जैन स्थानक येथे उप प्रवर्तनी साध्वी मंजुलज्योतिजी म. सा. चातु:मासानिमित्त आल्या आहेत. दैनिक “प्रभात’ मध्ये साध्वींच्या प्रवचनाचा सारांश रोज प्रसिद्ध केला जात आहे. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ भोसरी व दैनिक “प्रभात’ च्या वतीने अमृतवाणीची संग्रह पुस्तिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संघ व दैनिक “प्रभात’ तर्फे सर्वांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रथम बक्षीस सुभाष चुत्तर यांच्या तर्फे 5001 रुपये, द्वितीय बक्षीस डॉ. जवाहर भळगर यांच्या तर्फे 3001 रुपये, तृतीय बक्षीस डॉ. प्रदीप गांधी यांच्या तर्फे 2001 रुपये, तर उत्तेजनार्थ 501 रुपयांची पाच बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच सुभाष बोथरा यांच्या तर्फे मायाबाई बोथरा यांच्या स्मरणार्थ सर्व सहभागी सदस्यांना गिफ्ट हॅम्पर देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)