कर्तबगार व्यक्तिंमुळे पुरस्काराची उंची वाढते : मोहनबुवा रामदासी

वडूज : ह.भ.प. पुरुषोत्तम गरवारे यांचा सत्कार करताना डॉ. बी. जे. काटकर, डॉ. सौ. शुभांगी काटकर समवेत मोहनबुवा रामदासी, आचार्य शिवानंद भारती व इतर मान्यवर.

वडूज, दि. 13 (प्रतिनिधी) – समाजासाठी चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देवून नैतिक बळ दिले जाते. पुरस्कारामुळे काही व्यक्तींची सामाजिक किंमत वाढते तर काही कर्तबगार व्यक्तींना पुरस्कार दिल्याने त्या व्यक्तीचा सन्मान होण्याबरोबर पुरस्काराचीही उंची वाढते, असे मत सज्जनगड येथील मोहनबुवा रामदासी यांनी व्यक्त केले.
सिध्देश्वर कुरोली, ता. खटाव येथील पुरुषोत्तम गरवारे यांना अखिल भारतीय किर्तनकूल सातारा शाखेच्या वतीने किर्तनभूषण पुरस्कार वितरण व 50 वर्षाच्या किर्तन सेवेच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. वेद मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास अंभेरी येथील आचार्य शिवानंद भारती, पुणे येथील अ.प.मार्जने बुवा, अशोकराव कुलकर्णी, डॉ. बी. जे. काटकर, वसंतराव गोसावी, प्रा. एस. पी. देशमुख, श्रीमती शशिकला देशमुख, डॉ. शुभांगी काटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प.पू.रामदासी म्हणाले, गरवारे बुवांकडे श्रोत्यांचे प्रबोधन करण्याची कला अलौकिक आहे. अशा कर्तबगार माणसांमुळे सिध्देश्वर कुरोली गावाचा नावलौकीक सर्वदूर पोहोचला आहे.
शिवानंद भारती, प्रा. एस. पी. देशमुख, ऍड. सोमनाथ भरमगुंडे, सिध्देश्वर गोसावी, प्रेमानंद जोशी, आलेकरी गुरुजी, सुनंदा क्षीरसागर, स्नेहल कुलकर्णी आदिंची मनोगते झाली. सविता कारंजकर यांनी सुत्रसंचालन केले. चैतन्य गरवारे यांनी आभार मानले. वेदमूर्ती बाळासाहेब खटावकर, नंदकुमार जोशी, प्रतापराव देशमुख, राजूकाका देशमुख, शिवाजी बनसोडे, माधवराव ननावरे, राजेंद्र वाडेकर, ऍड. किरण जोशी, गजानन देशमुख, प्रा. इंगळे, चित्तरंजन खटावकर, अभय जोशी, स्वानंद गोसावी, सुनिल पाठक, शिरीष जोशी, मंदार जोशी, टिलूशेठ कुलकर्णी, अभिषेक जोशी, श्रेयश वाडेकर, नारायण आवळे आदिंसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)