कर्ण फाऊंडेशनचे कार्य दिशादर्शक : डॉ.श्‍याम बडवे

सातारा ः देवेंद्र भोसले यांचा सत्कार करताना डॉ. श्याम बडवे, शेजारी किशोर शिंदे आदी.मान्यवर

सातारा,दि.21 प्रतिनिधी- येथील कर्ण फाऊंडेशन सामाजिक संस्थेने दरवर्षीप्रमाणे नागपंचती निमित्त सर्पमित्रांचा केलेला गौरव व गुणवंत विद्यार्थ्यांचा केलेला सत्कार हे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे, असे मत आनंदाश्रमचे अध्यक्ष श्‍याम बडवे यांनी व्यक्त केले.
कर्ण फाऊंडेशनच्यावतीने सर्पमित्र देवेंद्र भोसले व आशुतोष सुर्यवंशी या सर्पमित्रांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच आदिती बिपीन कासार हिने एलएलएम पदवी प्राप्त केली व मृणाली कुमार लोखंडे हिने एमबीए परिक्षा उत्तीर्ण केल्याबद्‌ल त्यांचा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शेखर कोल्हापुरे, नगरसेवक किशोर शिंदे, हेमंत जोशी, कुमार लोखंडे आदी. उपस्थित होते.
पुढे बोलताना श्‍याम बडवे म्हणाले, साप व नाग हे निसर्ग चक्रातील महत्वाचे घटक आहेत. त्यांच्या विषयी प्रत्येकाच्या मनात भिती असते. त्यामागे गैरसमज हे मुख्य कारण असून ते दूर करण्याचे काम सर्पमित्र करित असतात. त्या मित्रांची दखल कर्ण फाऊंडेशन घेतल्याबद्‌ल बडवे यांनी कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)