स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षाची बंदी

सिडनी : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान चेंडूशी छेडछाड प्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर या दोघांवर एका वर्षाची बंदी घातली आहे. तर सलामीवीर कॅमेरून बेनक्रॉफ्ट याच्यावर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, यापूर्वीच स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट यांना बुधवारी मायदेशी परत पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. या तिघांच्या जागी ऑस्ट्रेलिया संघात मॅथ्यू रेनशॉ, जो बर्न्स आणि ग्लेन मॅक्सवेलचा समावेश केला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची चौथी कसोटी शुक्रवारी सुरू होणार आहे. यासाठी ऑस्ट्रेलिया संघ मंगळवारी जोहान्सबर्गला दाखल झाला होता. त्या वेळी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी ही माहिती दिली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)