“कर्ण’ची श्रावणी सहल ज्येष्ठांसाठी पर्वणीय ः वसंतशेठ जोशी

सातारा ः सहलीच्या शुभारंभप्रसंगी वसंतशेठ जोशी, किशोर शिंदे, शेखर कोल्हापुरे, हरिशेठ कासट.

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) – येथील कर्ण फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क श्रावणी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षीची सहल श्रीक्षेत्र अकरा मारुती दर्शन येथे नुकतीच संपन्न झाली. सहलीचा शुभारंभ साताऱ्यातील प्रसिद्ध व्यावसायिक वसंतशेठ जोशी यांच्या हस्ते व नगरसेवक किशोर शिंदे तसेच हरिशेठ कासट, प्रभाकर साळुंखे यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
यावेळी वसंतशेठ जोशी म्हणाले, व्यक्‍ती तितक्‍या प्रकृती या उक्‍तीनुसार ज्येष्ठांच्या समस्याही त्यांच्या वयानुसार व कौटुंबिक स्थितीनुसार वेगवेगळ्या असतात. आजकालच्या तरुण पिढीने ज्येष्ठांना समजून घेतल्यास वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही. अनेक लोक असे आहेत की, आयुष्याच्या या वळणावर असलेल्या ज्येष्ठांकरीता वेळ व पैसे खर्च करण्याची मानसिकता नसते. अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी कर्ण फाऊंडेशनची ही श्रावणी सहल म्हणजे एक आनंददायी पर्वणीच आहे आणि त्यांनी या सहलीचा मनमुराद आनंद लुटावा, अशा शब्दात त्यांनी सहलीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी किशोर शिंदे म्हणाले, कर्ण फाऊंडेशनच्या सहलीच्या या उपक्रमाने त्यांना होणारा आनंद अनेकांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत आहे. यावरुनच त्यांच्या या सहलीचे सार्थक झाले आहे असे मला वाटते, असे म्हणत त्यांनी सहलीस शुभेच्छा दिल्या.
कर्ण फाऊंडेशनचे अध्यक्ष शेखर कोल्हापुरे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या श्रावणी सहलीचे हे सलग चौदावे वर्ष असून प्रतिवर्षी लोकांचा सहलीस येण्याचा ओघ व उत्साह वाढतच आहे. त्यामुळे आम्हालाही अशी सेवा करण्यास प्रोत्साहन मिळते,अशा शब्दात त्यांनी ज्येष्ठांप्रती भावना व्यक्‍त केल्या.
सहली यशस्वी करण्याकरीता हेमंत जोशी, कुमार लोखंडे, वनिता परदेशी, अविनाश कोल्हापुरे, रमेश जोशी, अशोक महाडिक, वसंत कुंभार, पल्लवी दिक्षे, जया सपकाळ, राजन कोल्हापुरे, भिकाजीराव सूर्यवंशी, राजाराम मोहिते आदींनी विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)