कर्डिले, जगताप पिता-पुत्रांसह राठोड यांची उद्या हद्दपारी 

तहसीलदारांनी 17 जणांना केले हद्दपार : कोतवाली व तोफखाना पोलिसांकडे अंमलबजावणीसाठी आदेश रवाना 

नगर: महापालिका निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. नगर तहसीलदार यांनी आज 17 जणांवर हद्दपारीची कारवाई केली. कोतवाली हद्दीतील 16 आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक जणाचा समावेश आहे. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी सभापती सचिन जाधव यांच्या हद्दपारीवर शनिवारी (ता. 24) अंतिम आदेश होणार आहे. तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नेमीचंद लव्हाळे (रा. मोचीगल्ली), मतीन बशीर शेख (रा. जुनाबाजार, भिस्तगल्ली), फैरोजखान सुलेमानखान (रा. तख्ती दरवाजा), विजय रावसाहेब सुंबे (रा. मोहिनीनगर, केडगाव), मोहसीन अफजल पठाण (रा. एकनाथ नगर, केडगाव), बाळू शांताराम पाचारणे (रा. केडगाव), नितीन एकनाथ काते (रा. अचानक चाळ, रेल्वे स्टेशन), संदीप दत्तात्रय श्रीयाळ (रा. शिवम टॉकीज, नगर), वैभव भारत सावेकर (रा. गांधी मैदान, नगर), विष्णू बाबूराव दळवी (रा. कुंभारगल्ली, नालेगाव), राजेंद्र बाबासाहेब कोतकर (रा. केडगाव वेस), अनिल काशिनाथ शिंदे (रा. बोहरीचाळ, रेल्वेस्टेशन), तनवीर गुलाब हुसेन बागवान (रा. पटवर्धनचौक, आनंदीबाजार), ठकाजी किसन गेनप्पा (रा. गवळीवाडा, सिव्हिल हॉस्पिटल), विशाल रावसाहेब ताठे (रा. माळीवाडा), प्रवीण पंडितराव साठे (रा. हरिजनवस्ती, केडगाव) आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारंदामूल बागा गौड (रा. जंगूभाई तालीम, नगर) या 17 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी विशेष अधिकारांचा वापर करत या 17 जणांना हद्दपार केले आहे. या आदेशाची प्रत स्थानिक पोलीस ठाण्याला रात्री उशिरा तहसील कार्यालयातून रवाना झाली आहे. या आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी तहसील कार्यालयातून तपासणी होणार असल्याची माहिती तहसीलदार शिंदे यांनी दिली.

जिल्हा पोलीस दलाने महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडे सुमारे 671 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव दाखल केले होते. प्रातंधिकारी उज्वला गाडेकर यांच्याकडे सुमारे 481, तर तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्याकडे 190 प्रस्ताव सादर झाले होते. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, भाजपचे नगरसेवक सुवेंद्र गांधी, शिवसेनेचे नगरसेवक विक्रम राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांच्यासह प्रमुख राजकीय नेत्यांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. यातील प्रमुख नेत्यांचे प्रस्ताव नगर तहसील कार्यालयाकडे शेवटच्या दरम्यान सादर झाले आहे.

सुमारे 190 प्रस्ताव आहेत. त्यातील 17 जणांचे आदेश तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी आज काढले आहेत. आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी सभापती सचिन जाधव यांच्या हद्दपारीच्या निर्णयावर शनिवारी (ता. 24) अंतिम आदेश होईल, असे संकेत तहसील कार्यालयातून देण्यात आले आहेत.

मटका, जुगारांवर पहिल्या टप्प्यात कारवाई 

हद्दपारीच्या कारवाई करण्यात आलेले 17 जणांवर मटका, जुगार आणि मोबाईलवर जुगार खेळणाऱ्यांचा समावेश आहे. हद्दपारीच्या कारवाईली ही सुरूवात आहे. अंतिम टप्प्यात, म्हणजेच पुढील दोन दिवसांत हद्दपारींची कारवाई पूर्ण होईल, अशी माहिती तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी सांगितले.

हद्दपारांना मतदानासाठी दोन तास मिळणार

कारवाईच्या आदेशानुसार हद्दपार झालेल्यांना मत मोजणीपर्यंत (ता. 10) शहर सोडून राहावे लागणार आहे. मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी त्यांना शहरात येता येणार आहे. यासाठी दोन तासांचा वेळ देण्यात आला. यापेक्षा जास्तवेळ आढळून आल्यास त्यावर पुन्हा फौजदारी गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
6 :thumbsup:
2 :heart:
1 :joy:
1 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)