कर्ज मंजूर करून देण्याच्या आमिषाने गंडा

पुणे – व्यवसायासाठी नामांकित बॅंकेचे लोन मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून महिलेसह दोन भामट्यांनी एका व्यावसायिकाला चार लाख रुपयांचा गंडा घातला. ऑगस्ट ते जानेवारी या कालावधीत घोले रस्त्यावरील सप्तसूर सोसायटीत ही घटना घडली. शिवाजीनगर पोलिसांनी याप्रकरणी या महिलेसह तिच्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून ते पसार झाले आहेत.

गिरीश गायकवाड आणि तिच्या साथीदार महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भगवान टेकुळे (36, रा. आंबेगांव बुद्रुक) यांनी यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकुळे यांचा व्यवसाय आहे. या व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांना बॅंकेकडून लोन घ्यायचे होते. त्यासाठी त्यांनी गायकवाड आणि या महिलेशी संपर्क साधला होता. हे कर्ज मंजूर करण्यासाठी गायकवाड आणि या महिलेने टेकुळे यांच्याकडून चार लाख रुपये घेतले. मात्र, ठराविक कालावधीत कर्ज मंजूर न झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलीस उपनिरीक्षक जी. एम. बनसोडे अधिक तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)